Tuesday, July 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजCabinet meeting : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ महत्त्वपूर्ण निर्णय

Cabinet meeting : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ महत्त्वपूर्ण निर्णय

बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले ते शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक… जाणून घ्या कोणते निर्णय घेण्यात आले?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं. यानंतर त्यांच्या नेतृत्त्वात मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet decisions) पार पडली. या बैठकीत आज १८ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

यामध्ये मुंबईतील थीम पार्कसह सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक तसेच ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले अशा महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे.

राज्य मंत्रिमंडळातील झालेले महत्त्वाचे निर्णय

१. बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार. (गृहनिर्माण विभाग)

२. बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार. (गृहनिर्माण विभाग)

३. एमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी देणार. (नगरविकास )

४. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार. (नगरविकास विभाग)

५. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारणार. ( राज्य उत्पादन शुल्क)

६. जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता देणार. (वित्त विभाग)

७. राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद निर्माण करणार. (गृह विभाग)

८. एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार. (कामगार विभाग)

९. विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना आखणार. (विधि व न्याय विभाग)

१०. राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प उभारणार. (नियोजन विभाग)

११. अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड (सार्वजनिक बांधकाम विभाग)

१२. डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

१३. मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार. (नगरविकास विभाग)

१४. शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक (महिला व बालकल्याण विभाग)

१५. उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ (ऊर्जा विभाग)

१६. राज्यातील ६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता (आदिवासी विकास विभाग)

१७. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना
( आदिवासी विकास विभाग)

१८. राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता ( सामाजिक न्याय विभाग)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -