साप्ताहिक राशिभविष्य, १० मार्च ते १७ मार्च २०२४
![]() |
प्रतिष्ठा उंचावेल मेष : हा कालावधी आपणास अत्यंत चांगला आहे. उद्योगातून आणि इतर धंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. नवीन संधी चालून येणार आहे. पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दूरचे प्रवास संभवतात. परीक्षेत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडणार आहे. कुटुंबाकडून आपणास सहकार्य मिळेल. कोणतीही विपरित परिस्थिती समोर आली तरी आपण आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहात. कुटुंबामध्ये शुभवार्ता मिळतील. प्रगती होईल. कुटुंबामधील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येऊन त्यांना दिलासा मिळेल. सहकुटुंब धार्मिक ठिकाणी प्रवास कराल. आरोग्य उत्तम राहील. कोर्ट कायदेविषयक कार्य पुढे ढकलावीत. |
![]() |
विजय प्राप्त कराल वृषभ :आपल्या अपेक्षेनुसार आपली कामे पार पाडण्यात यश मिळेल, अपेक्षापूर्ती होईल. बरेच दिवस एखादे महत्त्वाचे काम होण्याची आपण वाट पाहत होता, असे कार्य पूर्ण झाल्याने उत्साहात व आनंदात वृद्धी होईल. मात्र कोणत्याही बाबतीत अतिरेक टाळा. थोड्या संयमाने शत्रूवर विजय प्राप्त करता येईल. मानपानाचे प्रसंग येऊ शकतात, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. नैराश्य जाईल. कुटुंब परिवारात सुवार्ता मिळून वैयक्तिक भाग्योदय होईल. अचानक धनलाभाचे योग. व्यवसायिक पर्यायातून विशेष लाभ. काही फायद्याचे सौदी हाती येतील. त्यानुसार नियोजन बदलावे लागेल. आयात-निर्यात व्यवसायापासून रिटेल व्यवसायिकांच्या उलाढालीत वृद्धी होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल. तांत्रिक ऑटोमोबाइल क्षेत्र विशेष लाभान्वित होईल. कुटुंब-परिवारात मंगलकार्य ठरू शकते. |
![]() |
सहकार्य लाभेल मिथुन :इतर कोणाच्याही आश्वासनांवर विसंबून राहणे म्हणजे नुकसानीस आमंत्रण दिल्यासारखे होईल. स्वतःचे कार्य स्वतः पूर्ण करा. चालढकल नको. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध होतील. मित्रमंडळी, कुटुंबाकडून सहकार्य लाभेल. नोकरी व्यवसाय धंद्यात अनुकूल परिस्थिती लाभेल. मात्र नोकरीच्या ठिकाणी राजकारण आणि गटबाजीपासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल. आपल्या कामाविषयी ज्ञान अद्ययावत ठेवा. कार्यमग्न राहा. इतरांच्या बोलण्याला बळी पडू नका. नंतर मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहिली तरी आर्थिक गरज भासू शकते. आर्थिक विवंचनेवर लगेचच कर्ज काढणे हा मार्ग शक्यतो अवलंबू नका. आर्थिक सुधारणा होईल. |
![]() |
शुभकार्य घडेल कर्क : नोकरी-व्यवसाय-धंद्यात अनुकूलता लाभेल. नोकरीमध्ये वेतनवृद्धी, पदोन्नती होऊ शकते. केलेल्या कामाचे, घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. उत्पन्नात वृद्धी होऊन नोकरीतील अधिकारकक्षा रुंदावतील. पण त्याचबरोबर जबाबदाऱ्याही वाढतील. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचा विवाह करण्यातील अडचणी दूर होऊन कुटुंबात शुभकार्य घडेल. त्याचप्रमाणे तरुण-तरुणींचा अर्थार्जनाचा शुभारंभ होईल. स्वतःच्या मालकीच्या घरात गृहप्रवेश करू शकाल. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत मानसन्मान मिळून अतिरिक्त कार्यभार सोपविला जाऊ शकतो. आपल्या अधिकार मर्यादेचे उल्लंघन करू नका. व्यवसाय धंद्यात तेजी व वाढून नफ्याच्या प्रमाणात होईल. |
![]() |
यशाच्या प्रमाणात वृद्धी सिंह : हाती घेतलेल्या कोणत्याही स्वरूपाच्या लहान-मोठ्या कार्यात यश मिळण्यासाठी ग्रहमान तसेच वातावरण अनुकूल आहे. समोरील व्यक्तीचा कोणत्याही स्वरूपात अपमान करू नका. आपल्या कार्यक्षेत्रात उन्नती आणि प्रगती होईल. वैयक्तिक सुवार्ता मिळून यशाच्या प्रमाणात वृद्धी होईल. काही वेळा विरोधकांचे मुद्दे पटणारे नसले तरी वाद-विवाद वाढवू नका. ते हिताचे ठरेल. थोडे सबुरीने व संयमाने घ्या. तसेच कुटुंब परिवारात आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. समोरील व्यक्तीच्या मतास उचित प्राधान्य देणे श्रेयस्कर ठरेल. जीवनसाथीचे सहकार्य लाभेल. |
![]() |
नवीन गुंतवणूक कन्या : अनुकूल कालावधी. हातात घेतलेल्या कार्यात यश. दीर्घकाळ रखडलेली जमीन-जुमला स्थायी संपत्ती याविषयीची कामे गतिशील होतील. आर्थिक फायदा होऊ शकतो. आर्थिक बाजू चांगली राहिल्याने नवीन गुंतवणुकीचा विचार असेल; परंतु नवीन लहान-मोठी कोणतीही गुंतवणूक करताना सतर्क राहणे जरुरीचे. गरज पडल्यास त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यायला विसरू नका. पूर्वी केलेल्या गुंतवणुका भरघोस फायदा मिळवून देतील. धंद्यातील परिस्थिती सामान्य राहिली तरी काही वेळेस अनपेक्षित प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. |
![]() |
रोजगार मिळेल तूळ : आपण आनंदी आणि उत्साही वातावरणाचा लाभ घेऊ शकाल. आर्थिक ओघ मोठा राहून परिस्थिती मजबूत राहील. त्यामुळे मनसोक्त खर्चही करू शकाल. कुटुंब-परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्याचे समाधान मिळेल. जे जातक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. काही कार्यानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवास कार्यसिद्ध राहतील. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील. शिक्षणासाठी परदेशगमन होऊ शकते. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. समस्यांनाही सामोरे जावे लागते, हे गृहीत धरून मार्गक्रमण केल्यास निश्चित यश मिळेल. |
![]() |
संयम आवश्यक
वृश्चिक : |
![]() |
अपेक्षित सहकार्य मिळेल धनु : सदरील कालावधीमध्ये आपल्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वृद्धी होईल. त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा आणि यश, कीर्ती वाढेल. राहत्या घरासाठीच्या सुशोभीकरणासाठी खर्च होईल. परिवारातील सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यवसाय-धंद्यात मोठे करारमदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येण्याची शक्यता. जमीन-जुमला इत्यादींच्या खरेदी विक्रीतून लाभ, मात्र वादविवाद टाळा. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळू शकतो. दीर्घकाळ रखडलेले व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाच्या मार्गावर येतील. |
![]() |
प्रेम-जिव्हाळा वाटेल मकर : या काळात जरी आपल्याला मिश्र फळे मिळणार असतील, तरी आपल्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. आपल्यासमोरील मोठी क्लिष्ट स्वरूपाची कार्य आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पूर्ण करू शकाल. प्रॉपर्टी यांच्यापासून मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता. वैद्यकीय व बांधकाम क्षेत्राशी संबंधित जातकांना मोठ्या स्वरूपातील फायद्याचे सौदे हाती येण्याच्या शक्यतेसह नवनवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी स्पर्धात्मक यश मिळवू शकतात. नोकरीत अनुकूल कालावधी. पदोन्नती, वेतनवृद्धीचे योग. सामाजिक कार्यात रस घ्याल. कुटुंबात भावंडांविषयी प्रेम, जिव्हाळा वाटेल. आपल्या भावंडांमुळे आपल्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारेल. |
![]() |
पथ्यपाणी सांभाळा कुंभ : आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक. पथ्यपाणी सांभाळा. त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात प्रेमसंबंध दृष्टिकोन बदलाची शक्यता. मतभेद, वादविवाद यापासून अलिप्त राहा. आपल्यासमोरील कार्य पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रमाची आवश्यकता. आपल्या क्रोधावर वेळीच नियंत्रण ठेवा. मनस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना घटित होऊ शकतात. नोकरीत केलेल्या कामाचे चीज होईल. उत्पन्नात वृद्धी होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळून परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये यश संपादित करता येईल. पूर्वी दिलेल्या मुलाखतींमधून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. |
![]() |
व्यावसायिक उलाढाल वाढेल
मीन : |