Wednesday, October 9, 2024
Homeक्रीडाRohit Sharma: रोहित शर्मा या दिवशी म्हणणार क्रिकेटला अलविदा, रिटायरमेंटबाबत केला हा...

Rohit Sharma: रोहित शर्मा या दिवशी म्हणणार क्रिकेटला अलविदा, रिटायरमेंटबाबत केला हा खुलासा

मुंबई: भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीवीरांपैकी एक रोहित शर्माने(rohit sharma) आपल्या रिटायरमेंटबाबत उत्तर दिले आहे. खरंतर, धरमशाला येथे टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या रिटायरमेंटबाबत चर्चा सुरू आहेत. काही क्रिकेट पंडित असा दावा करत होते की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायननंतर भारताचा कर्णधार कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. दरम्यान, यातच हिटमॅनने स्वत: आपल्या रिटायरमेंटबाबतचा खुलासा केला आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले की यावेळेस तो आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ करत आहे. अशातच निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही. त्याने स्पष्टपणे म्हटले की ज्या दिवशी मला वाटेल की मी चांगला खेळत नाही आहे तो लगेचच निवृ्त्ती जाहीर करेल.

रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली. शेवटच्या धरमशाला कसोटीत भारताने इंग्लंडला एक डाव आणि ६४ धावांनी हरवले. रोहित सामन्यानंतर म्हणाला, एक दिवस जेव्हा मी सकाळी उठेन आणि मला वाटले की मी आता चांगला खेळू शकत नाही मी लगेचच निवृत्त होईल. मात्र गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे.

रोहितने २०१९नंतर कसोटी क्रिकेटमध्ये ९ शतके लगावली आहे. बीसीसीआयने दुजोरा दिला की रोहित या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -