Sunday, July 14, 2024
HomeदेशMiss World 2024 : यंदाची मिस वर्ल्ड कोण? अमृता फडणवीस, क्रिती सॅनन,...

Miss World 2024 : यंदाची मिस वर्ल्ड कोण? अमृता फडणवीस, क्रिती सॅनन, पूजा हेगडे यांनी केली निवड!

दोन दशकांनंतर भारतात पार पडला ‘मिस वर्ल्ड’चा अंतिम सोहळा

मुंबई : मिस वर्ल्ड स्पर्धा म्हणजे तरुणींसाठी एक पर्वणीच असते. जवळपास दोन दशकांनंतर मिस वर्ल्ड स्पर्धा २०२४चा (Miss World 2024) अंतिम सोहळा भारतात आयोजित करण्यात आला होता. यासाठी मुंबईतील जिओ सेंटर मध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. जगभरातील सौंदर्यवती, फॅशन विश्वातले दिग्गज आणि मनोरंजन दुनियेतील तारे तारका या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. यंदा साऱ्यांचेच लक्ष अंतिम फेरीत पोहचलेल्या भारताच्या सिनी शेट्टीकडे होते. पण मिस वर्ल्ड २०२४ या किताबावर चेक प्रजासत्ताकच्या (Czech Republic) क्रिस्टिना पिस्कोव्हाने (Krystyna Pyszkova) नाव कोरलं, तर लेबनॉनची यास्मिना उपविजेती ठरली. विशेष म्हणजे या सोहळ्याच्या परीक्षकांच्या खुर्चीत क्रिती सॅनॉन आणि पूजा हेडगेसह अमृता फडणवीस देखील बसल्या होत्या.

मिस वर्ल्ड २०२४च्या अंतिम सोहळ्यासाठी बॉलीवूडकरांनी देखील हजेरी लावली. या स्पर्धेसाठी १२ परिक्षकांचं पॅनल होतं. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे यांच्यासह मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, अमृता फडणवीस, साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांनी मिस वर्ल्ड २०२४ या स्पर्धेचं परीक्षण केलं असून यंदाची मिस वर्ल्ड क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली आहे.

मिस वर्ल्ड २०२२४ हा सोहळा ‘सोनी लिव्ह इंडिया’वर लाइव्ह दाखवण्यात आला होता. तसेच या स्पर्धेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी करण जोहर आणि मेगन यांग या दोघांनी सांभाळली. या स्पर्धेत शान, नेहा कक्कर, टोनी कक्कर यांनी धमाकेदार परफॉर्मन्स केले.

१२० स्पर्धकांचा होता सहभाग

यंदाच्या स्पर्धेत १२० स्पर्धकांनी भाग घेतला होता. या सर्वांना मागे सारत क्रिस्टीना पिस्कोव्हाने विश्वसुंदरीचा किताब तिच्या नावावर केला आहे. मागील वर्षी ही स्पर्धा पोलंडच्या कॅरोलिना बिलावस्का हिने जिंकली होती. सिनी शेट्टीने यंदा भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. पण तिला विजेतेपदावर नाव कोरता आलं नाही. सिनी ही टॉप ८ पर्यंत पोहचली. पण तिला टॉप ४ मध्ये भाग घेता आला नाही. त्यामुळे ती या स्पर्धेतून बाहेर पडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -