Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीSubhash Yadav : ईडीने लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय सुभाष यादव यांना...

Subhash Yadav : ईडीने लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय सुभाष यादव यांना केली अटक

८ तासांच्या छापेमारीनंतर जप्त केली ‘इतकी’ मालमत्ता

पाटणा : बिहारमध्ये (Bihar) ईडीने (ED) लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सुभाष यादव (Subhash Yadav) यांच्याशी संबंधित व्यवसायासंदर्भात पाटण्यातील आठ वेगवेगळ्या ठिकाणी काल छापे (Raids) टाकले होते. यातून ईडीच्या पथकाने दोन कोटी रुपये रोख आणि गुंतवणूक आणि जमिनीशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. यानंतर काल रात्री उशिरा ईडीने सुभाष यादव यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने सुभाष यादव यांना शनिवारी रात्री उशिरा पाटण्यातील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारी त्यांना पाटणा येथील बेऊर कारागृहात हलवण्याची तयारी सुरू आहे.

सुभाष यादव यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूकही आरजेडीच्या तिकिटावर लढवली होती. त्यांच्यावर पाटण्यात अवैध वाळू उत्खनन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आयकर विभागानेही त्यांच्या जागेवर अनेकदा छापे टाकले आहेत.

माहितीनुसार, सोमवारी ईडीची टीम पाटणा येथील ईडीच्या विशेष न्यायालयात रिमांडबाबत अपील करणार असून सुभाष यादव यांना रिमांडवर घेण्याची मागणी करणार आहे. सुभाष यांना न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेण्यासाठी ईडी अपील करणार आहे. यानंतर तपास यंत्रणा सुभाष यादव यांना आपल्या ताब्यात घेईल आणि त्याच्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर त्याची सखोल चौकशी करेल. या अटकेनंतर आगामी काळात सुभाष यादव यांच्याशी संबंधित प्रकरण आणि अनेक राजकीय व्यक्तींशी असलेले त्यांचे संबंधही समोर येऊ शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -