Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजबाईपण भारी देवा

बाईपण भारी देवा

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

ती पान आहे, फुल आहे, खोड आहे, मूळ आहे, फळ आहे, फांदी आहे, झाड आहे आणि सर्वस्व आहे. ८ मार्च जागतिक महिला दिन. स्त्री शक्तीचा जल्लोष. विजयाचा, यशाचा, सन्मानाचा दिवस. तिच्या सामर्थ्याला, कर्तृत्वाला त्रिवार अभिवादन! जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनींना वंदन. सत्य समता, स्वातंत्र्य यांचा मिलाप म्हणजे शिक्षण. कोणतीही प्रगती शिक्षणावरच अवलंबून असते. स्वतःबरोबर कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा विकास करण्यासाठी सरसावलेली ती “स्त्री” तिच्यापासूनच उत्पत्ती. विश्वाची निर्मिती, क्रांती. ही स्त्री कधी मासाहेब जिजाऊंचे संस्कार, अहिल्यादेवींचे परोपकार, सावित्रीबाईंचे सत्कार्य, राणी लक्ष्मीचे शौर्य, रमाईंचा त्याग, हिरकणीचे मातृत्व, मुक्ताईचे अभंग, मीरेची भक्ती, राधेची प्रीती या सर्व भूमिकांतून आदर्श ठरलेली ही स्त्री शक्ती. स्त्री सामर्थ्य, धैर्य, औदार्य आणि धाडसाने क्रांती करणारी.

तुझ्यातली तू शोध अस्तित्वाला, गवसणी घाल आकाशाला, तोडूनी बेड्या बन स्वसंरक्षणाची ढाल, सामर्थ्याने पुढे चाल, इतिहासातील सुवर्ण हस्तक्षरांनी पानोपानी उमटलेली तिची स्पंदने आजही चिरंतन आहेत. प्रेरणादायी आहेत. आदर्शवादी आहे.

अन्यायाला प्रतिकार करणारी ती दुर्गा, ती भवानी, विणाधािरणी ती सरस्वती, घराघरांत गृहलक्ष्मी अन्नपूर्णा, विश्वाला आदर्श रूप देणारी ती जगतजननी, स्त्री शक्तीने विश्व व्यापलेले आहे. तिच्या मायेने ऊबदार झाले. या स्त्रीला समानतेची संधी दिली की, ती संधीच सोनं करते. पुरुषप्रधान संस्कृतीचा विषमतेचा बुरुज ढासळून समतेचे बीज पेरले, तरच या विश्वात डॉ. आनंदी जोशी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई, महाराणी ताराबाई, पंडिता रमाबाई, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, लतादीदी, पी. टी. उषा, सानिया मिर्झा, साईना नेहवाल, कल्पना चावला, मेरी कोम, सुनीती विल्यम्स, इंदिराजी, प्रतिभाताई पाटील, सिंधुताई सकपाळ, मेधा पाटकर, सुचिता कृपलानी, सरोजिनी नायडू, हेलन केलर, मदर टेरेसा, अॅनी बेझंट, कॅप्टन लक्ष्मी, भगिनी निवेदिता यांसारख्या अनेकविध विरांगणा सर्वच क्षेत्रांत कर्तृत्वाचे झेंडे क्षितिजापार फडकवले आहेत. त्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी झुंजावं लागलं. तरी जिद्दीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. चालीरीतीच्या तोडून श्रृंखला ठरली यशस्विनी…चार भिंतीची चौकट मोडून आकाशाला गवसणी… उंच भरारीच बळ तिच्या पंखात ती सौदामिनी… जिंकल्या दाही दिशा कर्तृत्वाच्या ती कर्तृत्वशालिनी, पेलली आव्हाने ती रणरागिनी, सखे तू तेजस्विनी…

आज प्रत्येक क्षेत्रात कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, कृषी, न्याय, समाज राजकारण, उद्योजिका सर्व क्षेत्रात बाजी मारलेली ती कर्तृत्वाने सिद्ध झालेली अटकेपार रोवले झेंडे. पुकारूनी बंड बदलत्या युगाबरोबर तिने बदलायलाच हवे! स्वतंत्र मन, स्वतंत्र व्यक्ती व तीही एक माणूसच आहे. म्हणून तिला सन्मानाचे स्थान मिळावे. निश्चितच तिच्या कारकिर्दीचा अभिमान, कौतुक, पाठबळ, प्रेरणा प्रोत्साहन द्या, खच्चीकरण करू नका. नका घालू तिला बंधन दाहीदिशा तीज खुल्या अांदण. चूल व मूल या चाकोरीबाहेर जाऊन प्रत्येकीने सर्वांगीण विकास साधला पाहिजे, यासाठी घरातून प्रोत्साहन मिळावे. आज समाजात चालणाऱ्या घटना पाहता त्यांना न्याय हक्क, अधिकार, शिक्षण आणि संरक्षण या पाच गोष्टी मिळाव्यात. त्याचप्रमाणे निर्णयाचे, शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळाले, तर ती वैचारिक प्रगल्भता आणि परिपक्वता समाजात निर्माण होईल. समाजाच्या विकास उन्नतीसाठी स्त्रियांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे. जर पन्नास टक्के भाग कार्यान्वित झाला, तर त्याचा लाभ हा कुटुंबासह देशाला सुद्धा होईल, हे निश्चित घडवूया स्वयंसिद्ध सक्षम महिला. वात्सल्यपूर्ण हिरकणी, तर कधी असंख्य वेदना सहन करून प्रसवणारी माता. आयुष्यभर आपले जीवन समर्पित करणारी आजी, मावशी, आत्या, बहीण, मैत्रीण. आपले सर्वस्व अर्पण करणारी पत्नी जीव लावणारे पुत्री, वहिनी या नात्यांना गुंफून ठेवणारी नि:स्वार्थी मनस्विनी, कर्तृत्वशालिनी, रणरागिनी, यशस्विनी, मानिनी सखे तू तेजस्विनी…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -