Saturday, July 5, 2025

भारताने पाचवी कसोटी एक डाव आणि ६४ धावांनी जिंकली

भारताने पाचवी कसोटी एक डाव आणि ६४ धावांनी जिंकली

तीन दिवसांत संपवला सामना; मालिका ४-१ ने खिशात


धर्मशाळा : पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. धर्मशाळा (Dharmashala) येथे खेळलेला हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला.


इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव ४७७ धावांवर संपला. अशा प्रकारे टीम इंडियाला २५९ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडचा दुसरा डाव १९५ धावांत आटोपला आणि भारताने एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला.


आज संपूर्ण इंग्लंड संघ दुसऱ्या डावात गडगडला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका ४-१ ने जिंकली.


शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता, पण त्यानंतर भारतीय खेळाडूंनी जबरदस्त पुनरागमन करत उर्वरित चारही सामने जिंकले.

Comments
Add Comment