महिलांना पंतप्रधान मोदींकडून मोठे गिफ्ट, उज्ज्वला योजनेच्या सबसिडीमध्ये एक वर्षांनी वाढ

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला आणि लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी उज्ज्वला योजनेबाबत मोठी घोषणा केली. मोदी सरकारने उज्ज्वला योजनेवरील ३०० रूपयांची सबसिडी पुढील एका वर्षासाठी वाढवली आहे. या निर्णयानंतर आता महिलांना ३१ मार्च २०२५ पर्यंत उज्ज्वला योजनेच्या सबसिडीचा लाभ मिळेल. जाणून घेऊया मोदी सरकारने काय काय निर्णय घेतले.



कॅबिनेटच्या बैठकीतील निर्णय


केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या या निर्णयामुळे १० कोटी कुटुंबांना फायदा होईल. केंद्रीय मंत्री पियुष गोएल यांनी यासंबंधी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की उज्ज्वला योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या ३०० रूपयांची सबसिडी आता ३१ मार्च २०२५ पर्यंत दिली जाणार आहे.


पियुष गोएल म्हणाले की गुरूवारी कॅबिनेटमध्ये सहा निर्णयांवर मोहोर लागली. उज्ज्वला योजनेवरील सबसिडीमध्ये १ वर्षांची वाढ. याशिवाय कच्च्या जूयची कमीत कमी समर्थन मूल्य वाढवले.



केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ


केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना डीआरमध्ये १ जानेवारी २०२४ पासून चार टक्के वाढ करण्याचा घेण्यात आला.

Comments
Add Comment

Virat-1' ship sinks off : ओमानच्या किनाऱ्याजवळ 'विराट-१' जहाज बुडाले, अमेरिकी नौदलाकडून १४ भारतीय खलाशांची सुटका

नवी दिल्ली : आखाती प्रदेशात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आणखी एक मोठा सागरी अपघात घडला आहे. भारतीय जहाज

E100 Fuel Nitin Gadkari : "काल रात्री ८ वाजता फाईलवर सही केली"; E100 इंधनाला हिरवा कंदील, नितीन गडकरींची मोठी घोषणा

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेलबाजारात अस्थिरता वाढत असताना भारताने पर्यायी इंधनाच्या

Indian Army Uniform 2026 : ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम! भारतीय लष्कराच्या गणवेशात मोठे बदल; ‘बंदी जॅकेट’ला मान्यता

भारतीय लष्कराने (Indian Army) वसाहतकालीन परंपरांपासून दूर जात आपल्या गणवेश संहितेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. औपचारिक

Jharkhand News : झारखंडमध्ये वीज कोसळून ७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महिला आणि १० वर्षीय मुलाचा समावेश

झारखंड : झारखंडमध्ये (Jharkhand) मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) काळात वीज कोसळण्याच्या (Lightning Strike) घटनांमध्ये गेल्या २४ तासांत ७ जणांचा

Sanjay Upadhyay : बोरिवलीतून एसी लोकलची संख्या वाढवा, आमदार उपाध्यायांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली : मुंबईतील बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय उपाध्याय यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली