मुंबई: आज संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. या दिवशी अनेकांचा उपवासदेखील असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमचाही उपवास असेल तर संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये जरूर समावेश करा.
साबुदाणा
साबुदाणा उपवासादरम्यान खाल्ला जाणारा पदार्थ आहे. साबुदाणा खिचडी अथवा खीर खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. तसेच यामुळे तुम्हाला एनर्जीही मिळते. यात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात जे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करतात. मात्र साबुदाणा आणि केळी खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे वेट लॉस करणाऱ्यांनी थोड्या बेतानेच खावे.
मखाणे
मखाण्याची खीर अथवा रोस्टेड मखाणे हे प्रोटीन आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे दीर्घकाळ एनर्जेटिक वाटते.
दही
दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते जे आपल्या बराच वेळ पोट भरल्याचे फील करून देते.
नट्स आणि ड्रायफ्रुट्स
बदाम, अक्रोड काजूसारख्या नट्स आणि ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात एनर्जी असते. यामुळे भूक शांत होते.
फळे
उपवासादरम्यान तुम्ही सफरचंद, पपईसारखी फळे खाल्ली पाहिजेत. यात फायबर मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहण्यास मदत होते.