Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

IND vs Eng: धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज चमकले

IND vs Eng: धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज चमकले

धरमशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यात धरमशाला येथे पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्यात दोन दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात ८ बाद ४७३ धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराह १९ तर कुलदीप यादव २७ धावांवर नाबाद आहेत. पहिल्या डावाच्या आधारावर भारताने २५५ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा पहिला संघ २१८ धावांवर आटोपला.



रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे शतक


पहिल्या दिवशीचा भारताने एक विकेट गमावला होता. यशस्वी जायसवालने ५७ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधील आपले १२वे शतक ठोकले. रोहितने १५४ बॉलमध्ये शतक ठोकले. रोहितनंतर शुभमन गिलनेही १३७ बॉलमध्ये शतक ठोकले. त्याचे हे चौथे शतक होते. दरम्यान, लंचनंतर टीम इंडियाला सलग २ झटके बसले. आधी बेन स्टोक्सने भारताचा कर्णधार रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. तर शुभमन गिलही जेम्स अँडरसनच्या बॉलवर क्लीन बोल्ड झाला.


त्यानंतर सर्फराज खान आणि देवदत्त पड्डिकल यांनी डाव सांभाळला. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी झाली. पड्डिकलने ६५ आणि सर्फराज खानने ५६ धावा केल्या. यानंतर भारताने नियमित अंतराने विकेट गमावल्या.

Comments
Add Comment