Friday, July 19, 2024
Homeदेशघरगुती गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त

घरगुती गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त

महिला दिनी केंद्र सरकारची खास भेट

नवी दिल्ली : जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना खास भेट दिली आहे. आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. स्वत:नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली.

मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ महिला शक्तीचे जीवन सुसह्य होणार नाही, तर करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल, पाऊल पर्यावरण संरक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल”, असेही मोदी म्हणाले.

मोदींनी महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यांच्या शक्ती, धैर्य आणि चिकाटीला सलाम केला आणि विविध क्षेत्रात त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. “आमचे सरकार शिक्षण, उद्योजकता, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या दशकातील आपल्या कामगिरीवरूनही हे दिसून येते.”

जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने ८ मार्च १९७५ रोजी महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केली. हा दिवस महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -