मुंबई: ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक महिलेसाठी विशेष असतो. महिला दिवसाची सुरूवात १९११मध्ये झाली होती.
तुमच्या आयुष्यातील महिलेला खुश करण्यासाठी तुम्ही तिच्यासाठी हँडमेड कार्ड देऊ शकतो. जर तुम्ही हे कार्ड तुमच्या हाताने बनवत असाल तर तुमची पत्नी अथवा बहीण हे पाहून खुश होईल. या कार्डमध्ये तुम्ही भावनिक मेसेज लिहू शकता.
तुम्ही तुमची पत्नी तसेच बहिणीला एखाद्या ट्रिपवर नेऊ शकता. जर तुम्हाला सुट्टी मिळत नसेल तर तुम्ही त्यांना जवळच्या ठिकाणी नेऊ शकता.
तुमच्या घरातील महिलेला खास जाणीव करून द्या. आयुष्यातील आपल्या महिलेसाठी जेवण बनवा. तुम्ही यावेळेस एखादी नवी रेसिपी ट्राय करू शकता. अथवा तिच्या पसंतीची एखादी डिश बनवू शकता.
तुम्ही तिच्यासाठी आपल्या हातांनी केक बनवू शकता. तसेच एक छोटासा केक कटिंगचा सोहळा करा.
महिलांना तुम्ही एक खास गिफ्ट देऊ शकता. असे गिफ्ट जे तुमची पत्नी, आई अथवा बहिणीला बरेच दिवसांपासून हवे आहे.