Saturday, July 5, 2025

IND vs ENG: धरमशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस करणार का खेळ?

IND vs ENG: धरमशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस करणार का खेळ?

धरमशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे ७ मार्च २०२४ला खेळवला जात आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेत हवामानाची साथ चांगली लाभली. मात्र धरमशाला कसोटीत पावसाचा खेळ रंगू शकतो. खरंतर मालिकेतील शेवटच्या सामन्यात खराब हवामान प्रेक्षकांची मजा किरकिरी करू शकतो. असे सांगितले जात आहे की पहिल्या दिवशी खराब हवामान खेळ खराब करू शकतो.


डोंगरांनी व्यापलेल्या धरमशालामध्ये तापमान खूप घसरले आहे. येथे गेल्या आठवड्यात बर्फवृष्टी पाहायला मिळाली. अशातच ही बर्फवृष्टी सामन्यात व्यत्यय आणू शकते. बर्फवृष्टीशिवाय पाऊसही सामन्यात शत्रू बनू शकतो. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिवसाच्या सुरूवातीपासूनच आकाशात पावसाचे ढग असतील.


दुपारी १२च्या सुमारास पाऊस येण्याची शक्यता आहे. यानंतर ३ तासापर्यंत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. अशातच पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ खराब होऊ शकतो.



टीम इंडियाचा मालिकाविजय


चार सामन्यांमध्ये भारताने आधीच मालिका विजय मिळवला आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील चारपैकी ३ सामने जिंकल्याने त्यांच्याकडे ३-१ अशी विजयी आघाडी आहे.

Comments
Add Comment