Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाIND vs ENG : स्पिनर्सनंतर रोहित-यशस्वीच्या वादळासमोर इंग्लंड हतबल, असा होता पहिला...

IND vs ENG : स्पिनर्सनंतर रोहित-यशस्वीच्या वादळासमोर इंग्लंड हतबल, असा होता पहिला दिवस

धरमशाला: धरमशाला कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने १ बाद १३५ धावा झाल्या आहेत. टीम इंडिया सध्या ८५ धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल नॉटआऊट राहिले. भारताचा कर्णधार ५२ धावांवर खेळत आहे. तर शुभमन गिल २६ धावांवर नाबाद आहे. यशस्वी जायसवाल ५७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वी जायसवालला शोएब बशीरने बाद केले.

रोहित-यशस्वीची तुफान खेळी

याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा संघ २१८ धावांवर आटोपला. याच्या प्रत्युत्तरात फलंदाजी करण्यास उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात शानदार राहिली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जायसवालने पहिल्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या. यशस्वी जायसवालने ५८ चेंडूत ५७ धावांची तुफानी खेळी केली. शोएब बशीरच्या बॉलवर बेन फोक्सने यशस्वी जायसवालला स्टंप आऊट केले.

जॅक क्राऊलीचे अर्धशतक, मात्र बाकी फलंदाज

टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्राऊली आणि बेन डकेटने चांगली सुरूवात करून दिली. दोन्ही सलामीवीरांना पहिल्या विकेटसाठी ६४ धावा जोडल्या. यानंतर सतत विकेट पडण्यास सुरूवात झाली. खासकरून इंग्ंलंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांकडे भारताच्या स्पिनर्सचे कोणतेही उत्तर नव्हते. १७५ धावांवर चौथा विकेट गमावणाऱ्या इंग्लंडच्या संघाचे ८ फलंदाज १८३ धावांपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतले.

भारतीय स्पिनर्ससमोर बेन स्टोक्सचा संघ ढेपाळला

भारतासाठी कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या गोलंदाजाने ५ फलंदाजांना बाद केले. रवी अश्विनने आपल्या १००व्या कसोटीत ४ विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळवण्यात यश मिळाले. भारतीय संघ दुसऱ्या दिवसापासून १ बाद १२४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरूवात करेल.

भारत या कसोटी मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे पाचवी आणि शेवटची कसोटी जिंकत ४-१ने विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -