Thursday, October 30, 2025
Happy Diwali

जागतिक महिला दिनानिमित्त कोपरखैरणेमध्ये कर्करोग प्रतिबंधकमोफत लसीकरण शिबीर

जागतिक महिला दिनानिमित्त कोपरखैरणेमध्ये कर्करोग प्रतिबंधकमोफत लसीकरण शिबीर

नवी मुंबई(प्रतिनिधी) -भारतात गर्भाशयमुखाच्या कर्क रोगामुळे (सर्हायकल कॅन्सरमुळे) दर ८ मिनिटांनी एका स्त्रीचा मृत्यू होतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन कर्क रोग होण्यापेक्षा त्याला प्रतिबंध घालणे केंव्हाही चांगले.

यासाठी "जागतिक महिला दिनानिमित्त" डॉक्टर सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नवीमुंबई यांच्यातर्फे सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया प्रा. लि. ने निर्मित लस ९ ते १४ वयोगटातील मुलींना दिनांक ८ मार्च २०२४ ते १४ मार्च २०२४ सकाळी १० ते ४ या वेळेत मोफत दिली जाणार आहे.

नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील साहेब, डॉक्टर सेल नवी मुंबई व कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. संतोष खंबाळकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सलूजाताई सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील माथाडी हॉस्पिटल कोपरखैरणे व मंगल प्रभू नर्सिंग होम जुईनगर येथे लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या लसीकरणा करिता नोंदणी सक्तीची आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.नोंदणी साठी संपर्कः डॉ. श्री. संतोष खंबाळकर-९८७०३३३७६६

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा