मुंबई: टेलिकॉम सेक्टरमध्ये आताही बीएसएनएलसारखे स्वस्त प्लान दुसऱ्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये नाही आहेत. कंपनी अनेक खास प्लान्स आकर्षक किंमतीवर ऑफर करत असते.
किती आहे किंमत
अशाच एका प्लानबद्दल आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही बोलत आहोत ३९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल. याची व्हॅलिडिटी ३० दिवसांची असते.
किती मिळणार डेटा?
या प्लानमध्ये युजर्सला एकूण १२० जीबी डेटा मिळतो. याच पद्धतीच्या दुसऱ्या प्लान्समध्ये हा डेटा वापरण्यासाठी डेली लिमिट असते. मात्र यात असे नाही.
अनलिमिटेड डेटाचा फायदा
हा प्लान कोणत्याही डेटा लिमिटशिवाय येतो. यात अनलिमिटेड डेटा मिळतो मात्र १२० जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ४० केबीपीएस होतो.
कॉलिंग आणि एसएमएस फायदे
यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचे फायदे मिळतात. याशिवाय रिचार्ज प्लानसोबत कोणतेही अतिरिक्त फायदे मिळत नाही.
कोणासाठी आहे हा प्लान?
अनेक भागांमध्ये बीएसएनएलची ४जी सर्व्हिस लाईव्ह झाली आहे. तुम्हीही त्या भागामध्ये राहत असाल तर हा प्लान चांगला पर्याय आहे.
दुसरे पर्यायही आहेत
हा कंपनीकडून दिला जाणाऱा महागडा प्लान्सपैकी एक आहे. दरम्यान, कंपनी अनेक स्वस्त पर्याय ऑफर करते जे कमी किंमतीत असतात.
५९९ रूपयांचा प्लान
कंपनी ५९९ रूपयांचा प्लानही ऑफर करते. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि ३ जीबी डेटा मिळेल. हा प्लान ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.