Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीBetting and gambling : सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींवर कारवाई होणार

Betting and gambling : सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींवर कारवाई होणार

नवी दिल्ली : सट्टेबाजी आणि जुगार (Betting and gambling) यासारख्या बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या वाढत्या जाहिरातींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने व्यापक सल्लात्मक सूचना जरी केल्या आहेत. विविध कायद्यांतर्गत निषिद्ध असलेल्या बेकायदेशीर कृत्यांच्या जाहिराती, प्रोत्साहन आणि समर्थन यांच्या प्रतिबंधावर या सल्लात्मक सूचनांमध्ये ग्राहक संरक्षण कायदा, २०१९च्या अनुषंगाने, भर देण्यात आला आहे.

सार्वजनिक जुगार कायदा, १८६७ अंतर्गत सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यास सक्त मनाई आहे आणि देशभरात बहुसंख्य ठिकाणी ही बेकायदेशीर कृत्ये मानली जातात. तरीसुद्धा ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्म्स आणि एप्स खेळाच्या नावाखाली तसेच थेट सट्टेबाजी आणि जुगाराच्या जाहिराती नेमाने करत आहेत. अशा कृत्याच्या समर्थनाचे मोठे सामाजिक-आर्थिक परिणाम होतात. विशेषतः युवा पिढीवर या बाबींचे मोठे दुष्परिणाम होतात. सट्टेबाजी आणि जुगार प्लॅटफॉर्म्सना प्रसिद्धी देण्यापासून, विविध माध्यम मंचांना सावध करून विविध सूचना जरी करण्याच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रयत्नांना या सल्ल्लात्मक सूचना अधोरेखित करतात. ऑनलाईन जाहिरातींच्या मध्यस्थांनाही अशा जाहिरातींसाठी भारतीय प्रेक्षकांना लक्ष्य करण्याविरुद्ध इशारा देण्यात आला आहे.

विद्यमान कायद्यांतर्गत प्रतिबंधित सेवा किंवा उत्पादनाच्या जाहिरातीला स्पष्टपणे प्रतिबंध घालणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे समर्थन प्रतिबंध मार्गदर्शक सूचना २०२२, या सल्लात्मक सूचनांमध्ये अधोरेखित करण्यात आल्या आहेत. माध्यम कुठलेही असो, या मार्गदर्शक सूचना सर्व जाहिरातींना लागू होत असल्याचा पुनरुच्चार या सल्लात्मक सूचनांमध्‍ये करण्‍यात आला आहे. ऑनलाईन जुगार आणि सट्टेबाजीच्या जाहिराती किंवा प्रोत्साहन यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध बेकायदेशीर असल्याचे लक्षात घेऊन, बेकायदेशीर कारवायांमधील कोणाचाही सहभाग तितकाच जबाबदार मानला जाईल, असा इशारा कलाकार, खेळाडू आणि इतर आदर्श मानल्या जाणाऱ्या व्यक्तींना या सूचनेव्दारे दिला गेला आहे.

सट्टेबाजी आणि जुगार यापुरताच या सूचना मर्यादित नसून यासोबतच कायद्याने प्रतिबंधित गोष्टींचे कुठल्याही प्रकारे समर्थन किंवा जाहिरात कडक तपासणीच्या अधीन असेल, अस इशारा सीसीपीएने या सल्लात्मक सूचनांच्या माध्यमातून दिला आहे. सल्लात्मक सूचनांचे उल्लंघन आढळल्यास ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ नुसार उत्पादक, जाहिरातदार, प्रकाशक, मध्यस्थ, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, समर्थक आणि संबंधितांसह सहभागी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली जाईल.

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सर्व भागधारकांना या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि भारतीय कायद्यानुसार बेकायदेशीर असलेल्या कृत्यांना प्रोत्साहन देण्याचे किंवा त्यांचे समर्थन करणे, टाळण्याचे आवाहन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -