मुंबई: आचार्य चाणक्य यांनी माणसांमधील अशा काही सवयींचे वर्णन केले आहे ज्या असल्यास ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. यासोबतच या सवयी असलेल्या व्यक्ती जे कार्य करतात त्यात ते यशस्वी होतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्यामध्ये धनसंचय करण्याची सवय जरूर असली पाहिजे. जी व्यक्ती पैशांची बचत करत नाही ती व्यक्ती कठीण काळात अधिक समस्येने घेरली जाते.
तर चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती हिशोबाने धनसंचय करते ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. तसेच आपल्या ध्येयाबद्दल कोणासमोरच कधीही वाच्यता केली गेली नाही पाहिजे. जर कोणाला अशी सवय असेल तर ती व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही.
आचार्य चाणक्य सांगतात की माणसाने नेहमी कामात मेहनती असले पाहिजे. आळस त्या व्यक्ती अयशस्वीतेच्या दिशेने घेऊन जातो. चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती मेहनतीच्या बळावर पुढे जाते ती व्यक्ती प्रत्येक कामात यशस्वी होते.