Wednesday, September 10, 2025

विचारपूर्वक विधाने करा, राहुल गांधींना निवडणूक आयोगाचा सल्ला

विचारपूर्वक विधाने करा, राहुल गांधींना निवडणूक आयोगाचा सल्ला

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींना सल्ला दिला आहे की त्यांनी विचारपूर्व विधाने करावीत.निवडणूक आयोगाने राहुल गांधींसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानजनक विधाने केली होती.

लवकर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचाराला सुरूवात करतील. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींसाठी खास दिशानिर्देश जाहीर करण्यात आले आहेत.

यात त्यांना निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारची विधाने करताना ती विचारपूर्वक करावीत, वादग्रस्त टीकाटिप्पणी करू नये असा सल्ला दिला आहे. हे दिशानिर्देश १ मार्चला जारी करण्यात आले होते. यात निवडणूक आयोगाने सूचना दिली होती की पक्ष, उमेदवार तसेच स्टार प्रचारकांनी कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

यात असेही म्हटले आहे की ज्या स्टार प्रचारक तसेच उमेदवारांना आधीच नोटीस मिळाली आहे त्यांनी पुन्हा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईला सामोले जावे लागू शकते.

Comments
Add Comment