Monday, June 23, 2025

अवघ्या १९ व्या वर्षी कृषा प्रवीण भंडारी हिने घेतली जैन धर्माची 'दीक्षा'

अवघ्या १९ व्या वर्षी कृषा प्रवीण भंडारी हिने घेतली जैन धर्माची 'दीक्षा'

नवी मुंबई(प्रतिनिधी): आजची तरुण पिढी संसार आणि संपत्तीच्या मागे पडत असताना, वाशीतील कृषा प्रवीण भंडारी या जैन समाजातील १९ वर्षीय सुशिक्षित तरुणीने जैन धर्माची 'दीक्षा' घेतली आहे.


मुळचे राजस्थान बुसी येथिल रहिवासी असलेले प्रवीण भंडारी (जैन मारवाडी) हे गेली ४० वर्षा पासुन नवी मुंबईत पत्नी, एक मुलगा हर्ष आणि मुलगी कृषा सोबत राहत असुन, ते पंख्या चे होलसेल व्यापारी आहेत.


कृषा हीचे शिक्षण १२वी पास होऊन ती संसार सोडून जैन धर्मासाठी तीने 'दीक्षा' घेण्याचा निर्णय घेतला. दीक्षा घेतल्यानंतर, देव आणि माणसातील ' मध्ये असलेली छोटी दरी जेव्हा दुर होते तेव्हा माणसाला देव पण प्राप्त होते.


२८ फेब्रुवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात येथे आयोजित निरोप समारंभाला श्री राजस्थान जैन सोशल ट्रस्ट नवी मुंबई आणि ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषा प्रवीण भंडारी हिला निरोप देण्यात आला.

Comments
Add Comment