भोपाळ: मध्य प्रदेशच्या(madhya prdesh) गुना जिल्ह्यात बुधवारी नीमच येथून टेकऑफ(take off) झालेले विमान गुना येथे क्रॅश झाले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने गुनामध्ये इर्मजन्सी लँडिंगसाठी मदत मागण्यात आली होती. यावेळेस इर्मजन्सी लँडिंग करताना अचानक हवाई पट्टीवरून बाहेर लँडिंग झाल्यानंतर विमान क्रॅश झाले. विमानात ट्रेनी पायलट जखमी झाले आहे.
अपघातग्रस्त विमानामध्ये पायलट नेंसी मिश्रा होते त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धावपट्टीवर रनवे करताना तलावाच्या किनाऱ्याच्या झाडांमध्ये जाऊन हे विमान पडले. या विमानाच्या अपघाताचा तपास केला जात आहे.
#WATCH | Madhya Pradesh: After developing a malfunction, a trainee aircraft flying from Neemuch to Dhana made an emergency landing during which it lost control. The trainee pilot sustained injuries and has been admitted to the hospital,” says Sub Inspector, Guna, Chanchal Tiwari. https://t.co/GIXqwDeGVy pic.twitter.com/hmvO50DThy
— ANI (@ANI) March 6, 2024
गुना पोलीस अधीक्षक संजीव सिन्हा यांनी या घटनेला दुजोरा दिला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान धावपट्टीवरून घसरून झाडांमध्ये जाऊन पडले. यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या महिला पायलटला दुखापत झाली.ही घटना संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळेस विमान धावपट्टीवर उतरत होते.