Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Tamannaah Bhatia : ओडेला २ नंतर तमन्ना भाटिया नीरज पांडेच्या पुढच्या चित्रपटात दिसणार?

Tamannaah Bhatia : ओडेला २ नंतर तमन्ना भाटिया नीरज पांडेच्या पुढच्या चित्रपटात दिसणार?

मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) हिच्याकडे यावर्षी प्रोजेक्ट्सचा रंजक लाइनअप आहे. अलीकडेच तिने तिच्या आगामी 'ओडेला २' (Odela 2) चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आणि आता तमन्नाला दिग्दर्शक नीरज पांडेच्या (Neeraj Pandey) पुढच्या प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिकेसाठी सामील करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. या बद्दल अजून काही माहिती आली नसून नक्की तमन्ना नीरज च्या चित्रपटात दिसणार का? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

तमन्ना भाटिया स्टारर अनटायटल प्रोजेक्ट ओटीटी वर रिलीज होणार आहे असं म्हटलं जातंय. सूत्रानुसार चित्रपटाचे शूटिंग २४ फेब्रुवारीपासून सुरू झाल असून चित्रपटाच्या डीट्सबाबत अत्यंत गुप्तता पाळली जात आहे. निर्मात्यांनी हा अनटायटल प्रोजेक्ट यावर्षी रिलीज होणार असल्याचं सांगितलं.

ओडेला २’ व्यतिरिक्त तमन्ना भाटिया जॉन अब्राहमसोबत " वेदा " मध्येही दिसणार असून तमिळ चित्रपट ‘अरनमानई ४’ मध्येही ती दिसणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >