Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीलखनऊमध्ये LPG सिलेंडर स्फोटात ३ अल्पवयीन मुलींसह ५ जणांचा मृत्यू

लखनऊमध्ये LPG सिलेंडर स्फोटात ३ अल्पवयीन मुलींसह ५ जणांचा मृत्यू

लखनऊ: राजधानी लखनऊमध्ये मंगळवारी रात्री काकोरी परिसरातील एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने ५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर चार इतर जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जरदोजी कारीगर मुशीर अली, त्यांची पत्नी हुस्ना बानो, अल्पवयीन मुली हुमा, हिबा आणि भाची राईया यांचा स्फोटात मृत्यू झाला. या स्फोटाच मुशीर यांच्या दोन मुली एक भाची आणि अजमत या जखमी आहेत.

हा स्फोट इतका भयानक होता की संपूर्ण घर कोसळले आणि आग लागली. मृत मुशीरजवळ फटाक्यांच्या व्यवसायाचा लायसन्सही होता. काही लोकांचे म्हणणे आहे की मुशीर यांच्या रूममध्ये दिवाळीत उरलेले काही फटाकेही होते.

तर घरातील इतर सदस्यांच्या मते आधी शॉट सर्किटमुळे आग लागली आणि त्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाला. मंगळवारी मृत्यू पावलेल्या मुशीर यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यात सामील होण्यासाठी पाहुणे मंडळी आली होती.

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. येथे ५ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -