कर्नाटकमधील व्यक्तीचा खळबळजनक व्हिडीओ होतोय व्हायरल
कर्नाटक : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) जवळ आलेल्या असताना मोठमोठ्या नेत्यांना जीवेमारण्याच्या धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvais), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनाही जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर आता थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जीवेमारण्याची धमकी आली आहे. एका व्यक्तीने हातात तलवार घेऊन समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
कर्नाटकमधील (Karnataka) मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने समाजमाध्यमांवर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार अशी धमकी त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Karnataka | Mohammed Rasool Kaddare posted a video on his social media account where he was seen holding a sword and threatening to kill PM Modi. An FIR under section 505(1)(b), 25(1)(b) of the IPC and Arms Act has been registered against him at Yadgiri’s Surpur police station.… pic.twitter.com/EhA3MDwwHt
— ANI (@ANI) March 5, 2024
पोलिसांनी मोहम्मद कद्दारे विरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ५०५ (१) (ब), २५ (१) (ब) तसेच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी मोहम्मद कद्दारे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.