
फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने अनेक युजर्स हैराण झालेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही #facebookdown ट्रेंड करू लागले. यावर युजर्स आपल्या तक्रारींसह मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
People coming to X to check if Facebook down 😛 #facebookdown pic.twitter.com/yPO1fQj9za
— Pawan (@pawankumarindo) March 5, 2024
काही युजर्सनी सांगितले की इन्स्टाग्राम आणि फेसबुक लोड होण्यामध्ये त्रास होत आहे. तर इन्स्टाग्राम युजर्स डाऊन झाल्यानंतरही जुन्या स्टोरीज पाहू शकत आहेत. तर फेसबुक अकाऊंट्स लॉगआऊठ झाले आहेत. फेसबुक डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस येत आहे.
People coming to X to check if #facebookdown or not 😂 pic.twitter.com/okfstDfbGo
— Memefied (@Memefied_O) March 5, 2024
हे काही पहिल्यांदाच झालेले नाही की मेटा कंपनीने स्वामित्व असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालेत. फेसबुकवर लोकांना अधिक समस्या येत आहेत. पहिल्यांदा फेसबुक सुरू केल्यावर लॉग इन नाही झाल्याने युजर्सला आपला फोन स्विच ऑफ-ऑन करावा लागला.