Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीपीएम किसान सन्मान योजनेत मिळालेले पैसे दारूसाठी न दिल्याच्या रागातून केली आईची...

पीएम किसान सन्मान योजनेत मिळालेले पैसे दारूसाठी न दिल्याच्या रागातून केली आईची हत्या

अमरावती : दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथे घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी आणि कारवाई सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन जांबेकर असे या नराधम आरोपी मुलाचे नाव आहे. तर गंगाबाई मोतीलाल जांबेवर असे हत्या झालेल्या आईचे नाव आहे. गंगाबाई यांच्या बॅंकेच्या खात्याच पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे आले असल्याची माहिती मुलगा पवनला कळताच पवनने आईकडे पैसे मागण्यास सुरु केले. परंतू आई पैसे देत नसल्यामुळे दारूसाठी पैसे हवेत म्हणून आईला तो छळ करत असे. आईकडे पैसे असून ती पैसे देत नाही याचा राग मनात धरत मुलाने आईला काठीने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत गंगाबाई गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच खळबळ माजली. पवन हा सतत आईशी दारूच्या पैशांसाठी वाद घालत असल्याचे गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी पवनवर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -