Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीPune Missing Leopard : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून पळालेला बिबट्या २४ तासांनंतरही बेपत्ताच!

Pune Missing Leopard : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून पळालेला बिबट्या २४ तासांनंतरही बेपत्ताच!

पुणे कात्रजच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पुणे : पुण्यातील कात्रज भागातील (Pune News) राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या (Rajiv Gandhi Zoological Park Katraj) पिंजऱ्यातून एक बिबट्या (Leopard) पिंजऱ्याचे गज वाकवून पळाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे २४ तास उलटून गेल्यानंतरही या बिबट्याला शोधण्यात वन विभागाला यश आलेलं नाही. हा बिबट्या कधीही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कात्रज भागातील सर्व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

प्राणिसंग्रहालयातून काल पळालेला बिबट्या अजूनही संग्रहालयाच्या आवारातच असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. हा बिबट्या मानवी वस्तीत शिरु नये यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेत. पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून तो पळाल्याचा दावा प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र मजबूत पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे.

बिबट्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमनदलासोबतच विविध रेक्यू टीम्स दाखल झाल्या आहेत. बिबटा गज वाकवून बाहेर पडल्याचं समोर आल्यानंतर त्याचा शोध सुरुच आहे. हा बिबट्या जर कात्रजच्या वस्तीत शिरला तर नागरिकांना मोठा धोका आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आवारात नागरिकांनी गर्दी केली आहे. मात्र या आवारात गर्दी करु नये, असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे. बिबट्या नेमका कोणत्या परिसरात आहे, याचा शोध लागत नसल्याने त्याने हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं असलं तरीही सर्व रेस्क्यू टीमकडून त्याला शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

नेमकं काय घडलं?

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीचा बिबट्या पसार झाला आहे. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र काल कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की पिंजऱ्यामध्ये बिबट्या नाही. पिंजऱ्याच्या लोखंडी सळ्या वाकवून तो पसार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. पसार झालेला बिबट्या प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असल्याचं सांगण्यात येतं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -