नवी मुंबई महापालिकेच्या इलेक्ट्रिकल बसच्या बॅटरीचा अचानक स्फोट, दोन बस जळून खाक
March 5, 2024 10:19 PM 105
नवी मुंबई(प्रतिनिधी ) - नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या तुर्भे आगारात उभ्या असलेल्या इलेक्ट्रिकल बसच्या बॅटरी चा अचानक स्फोट झाल्याने शेजारी पार्किंग केलेल्या दोन्ही बस जळून खाक झाल्या ही आगाची घटना रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
आग विझवण्यासाठी महापालिकेच्या वाशी येथील अग्निशमन दलाचे जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवली बस ला आग लागल्याची घटना घडताच घटनास्थळी परिवहन सेवेचे व्यवस्थापक योगेश कडुस्कर स्वता दाखल झाले.