नवी मुंबई : ऐरोली येथील दुर्व को-ऑपरेशन सोसायटीतील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची घटना घडली. दरम्यान शहरात नेहमीच घडत असलेल्या आगीच्या घटनांमुळे, इमारतींच्या फायर ऑडिट बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
गेल्या आठवड्यापासून एमआयडीसी, निवासी, रस्त्यांवरील वाहनांना आग लागण्याच्या घटना सतत घडत आहेत.
मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ऐरोली, सेक्टर -६, प्लॉट नंबर -९ येथील दुर्व को-ऑपरेटिव्ह सोसायटी मधील इमारतीच्या ५व्या माळ्यावरील, रूम नंबर -५०२ आणि ५०३ मध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
ऐरोली व कोपरखैरणे येथील महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवली.