Uddhav Thackeray : रोज गळ्यात नवा हार, आयडालॉजी तडीपार!

व्यंगचित्रातून भाजपने उद्धव ठाकरेंना लगावली चपराक


मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) सर्वच राजकीय पक्षांनी (Political parties) कंबर कसली आहे. त्यातच आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी विरोधी पक्षांवर नेत्यांकडून जोरदार वार प्रतिवार केले जात आहेत. सत्ताधारी व विरोधींनी एकमेकांविरोधात टीकास्त्र उपसले आहे. त्यातच ठाकरे गटाचे (Thackeray Group) मुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपबाबत 'अबकी बार, भाजप तडीपार', अशी टीका केली. त्यांच्या या टीकेला आता भाजपकडून (BJP Party) चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.


भाजपने आपल्या अधिकृत एक्स (X) अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचे एक व्यंगचित्र (Caricature) शेअर करत ठाकरेंना जोरदार चपराक लगावली आहे. या व्यंगचित्राला 'रोज गळ्यात नवा हार, आयडालॉजी तडीपार!', असं कॅप्शन देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे नेहमी कोणत्या ना कोणत्या पक्षाबाबत बोलतात मात्र त्यांना आता स्वतःची विचारधारा राहिलेली नाही, अशी टीका यातून करण्यात आली आहे.





या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे हार घातले आहेत, असं दाखवलं आहे. मात्र, त्यांची आयडिऑलॉजी यात तडीपार झाली आहे, अशी टीका भाजपने केली आहे.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई