व्यंगचित्रातून भाजपने उद्धव ठाकरेंना लगावली चपराक
मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) सर्वच राजकीय पक्षांनी (Political parties) कंबर कसली आहे. त्यातच आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी विरोधी पक्षांवर नेत्यांकडून जोरदार वार प्रतिवार केले जात आहेत. सत्ताधारी व विरोधींनी एकमेकांविरोधात टीकास्त्र उपसले आहे. त्यातच ठाकरे गटाचे (Thackeray Group) मुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपबाबत ‘अबकी बार, भाजप तडीपार’, अशी टीका केली. त्यांच्या या टीकेला आता भाजपकडून (BJP Party) चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.
भाजपने आपल्या अधिकृत एक्स (X) अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचे एक व्यंगचित्र (Caricature) शेअर करत ठाकरेंना जोरदार चपराक लगावली आहे. या व्यंगचित्राला ‘रोज गळ्यात नवा हार, आयडालॉजी तडीपार!’, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे नेहमी कोणत्या ना कोणत्या पक्षाबाबत बोलतात मात्र त्यांना आता स्वतःची विचारधारा राहिलेली नाही, अशी टीका यातून करण्यात आली आहे.
रोज गळ्यात नवा हार ,आयडालॉजी तडीपार! pic.twitter.com/5i8E3g4yms
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) March 5, 2024
या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे हार घातले आहेत, असं दाखवलं आहे. मात्र, त्यांची आयडिऑलॉजी यात तडीपार झाली आहे, अशी टीका भाजपने केली आहे.