Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीराज्यातील ४२ हजार कंत्राटी वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर

राज्यातील ४२ हजार कंत्राटी वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर

मुंबई : राज्यभरातील ४२ हजार कंत्राटी वीज कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वात हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात (Strike) राज्यातील महावितरण (Mahavitaran), महानिर्मिती (Mahanirmiti) आणि महापारेषणचे (Mahapareshan) कंत्राटी कर्मचारी (Contract Workers) सामील झाले आहेत. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत.

नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी वीज कर्मचारी आणि चंद्रपुरातही कंत्राटी वीज कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निर्मिती केंद्राच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली.

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या, हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नये आणि ३० टक्के वेतनवाढ देण्यात यावी. त्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या. यासह इतरही मागण्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आहेत. त्या मान्य होत नसल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २८ आणि २९ फेब्रुवारीला लाक्षणिक संप केला होता आणि त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ५ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार, आता कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन पुकारले आहे.

दरम्यान, नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात ६६० मेगावॅटचे एकूण तीन संच आहेत. येथे रोज १९६० मेगावॅट विजेची निर्मिती होते. या संपात येथील सहा हजार कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असल्याने पुढील काळात येथील वीज निर्मितीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -