Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूज‘त्यांचा अली, तर आमचा बजरंग बली’: आमदार नितेश राणे

‘त्यांचा अली, तर आमचा बजरंग बली’: आमदार नितेश राणे

मुंबई : मालवणी मालाडमध्ये अतिक्रमण करण्याच्या नावाने बाहेरून लोक आणण्यात येत आहेत. माहीम येथून आलेल्या लोकांना इथे मतदार बनविण्यात आले आहे. मस्जिद, मदरशे बांधून हिंदूंना मुंबईबाहेर काढण्याचे षडयंत्र जिहाद्यांचे आहे. कोणी इथे मस्जिद उभारली, तर त्या बाजूला लगेच हनुमान मंदिर उभारा, असा सल्ला देत ‘त्यांचा ‘अली’ तर आमचा बजरंग बली’ अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी दिली.

अवैध गतीविधी व हिंदू हितासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मालाड मालवणी परिसरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्यामध्ये आमदार राणे बोलत होते. ते म्हणाले की, त्यांचे उरूस, मिरवणूक काढण्यासाठी कोणत्याही अटी नियम घालत नाहीत. हिंदू सणांच्या मिरवणुकांना पोलीस अटी घालतात. यांचे डीजे १२ वाजेपर्यंत चालतात. पण हिंदूना १० वाजता डीजे बंद करण्याची सक्ती पोलीस करतात. जेवढा मानसन्मान हिंदू पोलिसांना देतात, तेव्हा जिहादी देतात का, असा सवाल राणे यांनी केला.

लँड जिहादच्या नावाने मालवणीमध्ये अतिक्रमण सुरू आहे. टिपू सुलतानचे बोर्ड जिहादी लावत आहेत. हे लोक संविधान मानत नाहीत. त्यांना संविधान नको आहे, देशात शरिया कायदा लागू करण्याचा यांचा डाव असल्याचा आरोपही राणे यांनी केला. येथे रामनवमीच्या मिरवणुकीत चपला मारण्यात आल्या. म्हणून आता मोर्चात चालत असताना मी मस्जिदसमोर थांबलो, कुणी आज चप्पल भिरकावली असती तर मस्जिदमध्ये जाऊन तमाशा केला असता. ज्यांनी ज्यांनी रामनवमीच्या मिरवणुकीत चप्पल भिरकावली, त्यांचा हिशोब घेणार असा इशाराही आमदार राणे यांनी यावेळी दिला. राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असल्याने त्यामुळे पोलिसांनी येथील हिंदूंच्या महिला, मुलींच्या संरक्षण करावे. अन्यथा पोलिसांना २४ तासांची सुट्टी देऊन मालवणीत भगवा फडकवून दाखवतो, असे आमदार राणे यावेळी म्हणाले.

मालवणीचे नाव मुझ्झफर नगर करतील

मालवणीत एका एका घरात ३०-४० रोहिंगे, बांगलादेशी राहत आहेत. याची पोलिसांकडे कोणतीच आकडेवारी नाही. पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही घरात घुसून त्यांचे हात-पाय काढून त्यांच्या देशात पाठवू. मस्जिद, मदरसे आणि अतिक्रमणे वाढवून मालवणीचे नाव मुझ्झफर नगर करतील, असा इशारा आमदार राणे यांनी दिला. येथील अनधिकृत बांधकामांवर पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा आमचा बुलडोझर चालवू असा इशाराही राणे यांनी प्रशासनाला दिला.

हा मोर्चा नव्हे संदेश

आज काढण्यात आलेला हा मोर्चा नव्हता, तर हिंदू एक असल्याचा संदेश असल्याचे राणे म्हणाले. यापुढे अन्यायाविरोधात ताकद दाखवा, आम्ही तुम्हाला सुखरूप घरी आणू असे आश्वासनही त्यांनी दिले. अन्याय होईल तिथे हिंदू समाज उभा राहिला पाहिजे आणि हिंदूंची मालवणी अशी ओळख निर्माण झाली पाहिजे, असेही राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -