Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणNilesh Rane : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर केवळ भाजपचाच अधिकार : निलेश...

Nilesh Rane : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर केवळ भाजपचाच अधिकार : निलेश राणे

सावंतवाडी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मी आतापर्यंत तीन वेळा निवडणूक लढविली. मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीला जेवढे पोषक वातावरण आहे तेवढे यापूर्वी कधीही नव्हते. अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना मी तीन लाख मते घेतली. आता राणे भाजपवासी झाल्यामुळे ती तीन लाख मते भाजपमध्ये जमा झाली आहेत. त्यामुळे बेरीज आमचीच होते. तर उबाठा एकाकी असून त्यांच्यापासून शिवसेना व भाजप बाजूला झाले आहेत. त्यामुळे चारही बाजूने भाजपला पोषक वातावरण असून रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर यावेळी केवळ भाजपचाच अधिकार आहे, असा दावा माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वयाच्या ७३ व्या वर्षी रात्रंदिवस काम करीत आहेत. निवडणुकीच्या दरम्यान एका दिवसात चार राज्यांमध्ये ते प्रचार करताना दिसले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील रात्रंदिवस अनेक भागात फिरून भारतीय जनता पार्टीच्या मतदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम करीत आहेत.

महाराष्ट्र व गोवा राज्याचे संबंध चांगले राहावे यासाठी काम करणारे डॉ. प्रमोद सावंत हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. आपल्या लोकसभा मतदारसंघासाठी ते क्लस्टर प्रमुख या नात्याने करीत असलेल्या कामाला येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते नक्कीच समर्थपणे साथ देतील व भाजपच्या ४०० अपेक्षित जागांमध्ये ४०१ वी जागा ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

२०१४ नंतर मोदी सरकारच्या काळात अनेक लोकोपयोगी योजना या केंद्र सरकारने राबविल्या असून त्याचा सर्वसामान्य जनतेला फायदा होत आहे. याच योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे असून या भागातील खासदार हा भाजपचाच निवडून जाण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -