अयोध्या : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीनंतर या नरेंद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान व्हावेत, असे साकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अयोध्येतील रामलल्लाला घातले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सोमवारी रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत सोमवारी आले होते. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. निलमताई राणे याही उपस्थित होत्या. रामलल्लाचे दर्शन झाल्यावर राणे परिवाराचा राम मंदिर ट्रस्टकडून सत्कार करण्यात आला. ट्रस्टकडून नारायण राणे यांनी अयोध्येतील राममंदीराची प्रतिकृती भेट देण्यात आली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, रामलल्लाच्या दर्शनाचे सौभाग्य मला मिळाल्याने मी खरोखरीच खुप भाग्यवान आहे. रामलल्लाच्या दर्शनाने माझ्या मनाला खुप शांती मिळाली आहे.