मुंबई: संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीची तयारी सुरू झाली आहे. या वर्षी ८ मार्चला महाशिवरात्री साजरी केली जात आहे. पंचागानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. असे म्हटले जाते की याच दिवशी शिव-पार्वतीचा विवाह झाला होता.अशातच तुम्ही भोलेनाथला काही खास गोष्टी अर्पण करून त्याची कृपादृष्टी मिळवू शकता.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला गंगाजलचा अभिषेक करणे अतिशय शुभ मानले जाते.
तुम्ही भोलेनाथाला मधही जरूर अर्पण करा.
सोबतच मोहरीचे तेलही चढवणे अतिशय शुभ मानले जाते. यामुळे ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते.
तुम्ही भगवान शंकराला बेलपत्र जरूर अर्पण करा. बेलाची पाने भगवान शंकराला अतिशय प्रिय आहेत.