Prasad Lad : मनोज जरांगे बडबड बंद करा अन्यथा मराठा समाजच जागा दाखवून देईल!

प्रसाद लाड यांचा जरांगेना इशारा


मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) संतप्त आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधात टीकास्त्र उपसले आहे. मनोज जरांगे हे पातळी सोडून भाषा वापरत असल्यामुळे मराठा समाजातील काही लोकांनीही नाराजी दर्शवली आहे. त्यातच भाजप नेते व देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही मनोज जरांगे यांना लक्ष्य केले. 'मनोज जरांगे बडबड बंद करा अन्यथा मराठा समाजच जागा दाखवून देईल!', असा इशारा त्यांनी जरांगेंना दिला आहे.


मनोज जरांगे पाटील गेले काही दिवस सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट भाषेत टीका करत आहेत. रविवारीदेखील जरांगे पाटील यांनी फडणवीसांनी आपल्याविरोधात डाव रचल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना फटकारले. त्यांनी म्हटले की, 'मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा नौटंकी सुरु झाली आहे. ते पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करु लागले आहेत. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवत आहेत', अशी टीका त्यांनी केली.


पुढे प्रसाद लाड म्हणाले, 'यापूर्वीही मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची होती. आतादेखील ते शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत आहेत. शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज सरकारसोबत आहे. मनोज जरांगे अशीच बडबड करत राहिले तर समाज त्यांना नक्कीच जागा दाखवेल', असे लाड यांनी म्हटले.

Comments
Add Comment

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या