मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ची सुरूवात जूनमध्ये होईल. यात भारताचा पहिला सामना आयर्लंडशी होत आहे. टीम इंडिया आणि आयर्लंड ५ जूनला न्यूयॉर्कमध्ये आमनेसामने येतील. यानंतर भारताचा सामना पाकिस्तानशी रंगणार आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. याच कारणामुळे या सामन्याचे तिकीट खरेदी करणे तितके सोपे नसते. मीडिया रिपोर्टनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या सामन्याच्या तिकीटाचे दर गगनाला भिडले आहेत. एका वेबसाईटवर लाखो रूपयांना विकले जात आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९ जूनला न्यूयॉर्कमध्ये सामना रंगणार आहे. रिपोर्ट्सनुसार या सामन्याच्या तिकीटाची सुरूवातीची किंमत ५०० रूपये होती. हे अधिकृत विक्रीच्या वेळेचा दर आहे. मात्र यानंतर या या सामन्याच्या तिकीटाचे दर गगनाला भिडले आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्याच्या व्हीआयपी तिकीटाची सुरूवातीची किंमत ४०० डॉलर इतकी सांगितली आहे. म्हणजेच तब्बल ३३ हजार रूपये असेल. तर एका अन्य वेबसाईटवर हे तिकीट ४० हजार डॉलरला विकले जात आहे. जर भारतीय रूपयांमध्ये बोलायचे झाल्यास हे तब्बल ३३ लाख रूपये होतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. मात्र आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येतात.