Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीरिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा, रिक्षामध्ये राहिलेला लॅपटॉप महिला प्रवाशाला केला परत

रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा, रिक्षामध्ये राहिलेला लॅपटॉप महिला प्रवाशाला केला परत

नवी मुंबई : कोपरखैरणे ते महापे एमआयडीसी प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरलेला महागडा लॅपटॉप संबधित महिला प्रवाशाला परत करण्याचा प्रामाणिकपणा कोपरखैरणेतील रिक्षा चालक संदीप साळुंखे (फौजी) याने दाखवला आहे. त्यामुळे या रिक्षा चालकाचे कौतुक होत आहे.

कोपरखैरणे सेक्टर-15 मध्ये राहणारी एक महिला गत बुधवारी दुपारी कोपरखैरणेतील शिवशंभो रिक्षा स्टँडवरुन संदीप साळुंखे (फौजी) याच्या रिक्षातून महापे एमआयडीसीतील कंपनीत गेली होती. यावेळी रिक्षामधुन उतरताना सदर महिला आपला लॅपटॉप रिक्षामध्ये विसरुन गेली होती. कंपनीत गेल्यानंतर काही वेळाने तिला आपला लॅपटॉप रिक्षामध्ये राहिल्याचे लक्षात आले. त्यानंतर या महिलेने पुन्हा कोपरखैरणेतील शिवशंभो रिक्षा स्टँड गाठून तेथील रिक्षा चालकांना आपल्या लॅपटॉपबाबत माहिती दिली. त्यानंतर तेथील रिक्षा चालकांनी आपल्या स्टँडवरील व इतर रिक्षा चालकांच्या व्हॉट्सऍपव ग्रुपवर लॅपटॉप विसरल्याची माहिती टाकली.

दरम्यान, फौजी याने महिलेला रिक्षातुन महापे येथे सोडल्यानंतर तो रिक्षा घेऊन जेवण्यासाठी घरी गेला. त्यानंतर तो रिक्षाची साफसफाई करताना, रिक्षाच्या पाठीमागील भागात लॅपटाप राहिल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने सदर लॅपटॉप व्यवस्थित काढून ठेवला. त्यानंतर तो पुन्हा रिक्षा स्टँडवर गेल्यानंतर त्याला रिक्षामध्ये एका महिलेचा लॅपटॉप राहिल्याची माहिती इतर रिक्षा चालकांकडून त्याला समजली. त्यानंतर फौजी याने रिक्षा स्टॅन्ड चे अध्यक्ष नाना प्रकाश भाऊ व सतिश पाटील यांच्या उपस्थितीत सदर महिलेला तिचा लॅपटॉप परत दिला. रिक्षा चालक संदीप साळुंखे याने प्रामाणिकपणे सदर महिलेचा लॅपटॉप सुस्थितीत परत दिल्याने सदर महिलेने संदीप साळुंखे (फौजी) याचे आभार मानले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -