मुंबई: अनेकांची सकाळी ही कॉफीशिवाय अपूर्ण असते. कॉफीमुळे त्यांना एनर्जेटिक वाटते. कॉफी पिण्याचे अनेक लाभ जरी असले तरी रिकाम्या पोटी ते पिणे शरीरास नुकसानदायक ठरणारे आहे. अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास अपचनाचा त्रास संभवतो. तसेच पोषणतत्वे शरीरात योग्य प्रकारे शोषली जात नाहीत.
सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय अॅसिड रिफ्लक्स वाढवते. तसेच कार्टिसोलचा स्तरही वाढवते. यामुळे तणाव वाढू शकतो.
रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे दुष्परिणाम
चिंता आणि भीती
कॅफेन एक उत्तेजक आहे जे सतर्कता आणि उर्जेचा स्तर वाढवण्याचे काम करते. दरम्यान, रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याचा याचा प्रभाव अधिक वाढू शकतो. यामुळे चिंता, भीती तसेच तणाव वाढू शकतो.
पोटात अॅसिडिटीचा धोका
कॉफीमध्ये अॅसिड असते त्यामुळे रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास अॅसिडीटीची समस्या वाढू शकते. कॅफीन आणि अॅसिडचा स्तर पोटामध्ये जळजळ निर्माण करू शकतात.
ब्लड शुगरमध्ये अनियंत्रण
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होऊ शकतात. जेव्हा रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केले जाते तेव्हा रक्तातील साखर वेगाने वाढते.
तणाव
कॅफेनमुळे शरीरातील कॉर्टिसोल हे हार्मोन उत्तेजित होते. याचा आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो. यामुळे कमकुवत रोगप्रतिकारक क्षमता, वजन वाढणे तसेच मूडसंबंधीचे आजार होतात.