मुंबई: महिलांना जर छोट्या कालावधीत चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर पोस्ट ऑफिसची महिला सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करून चांगले रिटर्न मिळवू शकतात.
सरकारने महिलांच्या गरजा लक्षात घेता २०२३मध्ये महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम लाँच केली होती. ही एक छोटी बचत योजना आहे. यात तुम्ही दोन वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता.ही योजना खासकरून महिलांसाठी बनवण्यात आल ीआहे. यात गुंतवणुकीची सर्वाधिक रक्कम २ लाख रूपये ठरवण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत महिला दोन वर्षांसाठी खाते खोलू शकतात. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम अंतर्गत जमा झालेल्या राशीवर ७.५० टक्के व्याजदराचा लाभ मिळतो. या स्कीमध्ये गुंतवणूक करून महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनू शकतात. योजनेंतर्गत १० वर्षे अथवा त्याहून अधिक महिला योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटअंतर्गत २ लाख रूपये जमा केल्यास तुम्हाला दोन वर्षांनी २, ३१, १२५ रूपये मिळतील.