Thursday, May 15, 2025

देशमहत्वाची बातमी

PM Modi: 'विचारपूर्वक विधाने करा, वाद टाळा', लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींची मंत्र्यांना सक्त ताकीद

PM Modi: 'विचारपूर्वक विधाने करा, वाद टाळा', लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींची मंत्र्यांना सक्त ताकीद

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्र्यांना सक्त ताकीद दिली. पंतप्रधा मोदींनी मंत्र्यांना सांगितले की विचारपूर्वक विधाने करा तसेच वादग्रस्त विधाने करणे टाळा.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी राजधानी दिल्लीच्या चाणक्यपुरी परिसरातील सुषमा स्वराज भवनमध्ये आपल्या कॅबिनेटमध्ये सामील मंत्र्यांसोबत बैठक केली. त्यांनी या बैठकीत मंत्र्यांना वादग्रस्त विधानांपासून दूर राहण्यास सांगितले. तसेच जे काही बोलाल ते विचारपूर्वक बोला. असेही ते म्हणाले.


पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिपरिषदेतील सदस्यांच्या डीप फेकपासून सतर्क राहण्यास सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले, जर बोलायचे आहे तर सरकारी योजनांबद्दल बोला. वादग्रस्त विधानांपासून दूर राहा.


भाजपने जारी केलेल्या १९५ लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत ७ अशी नावे आहेत जे सध्या राज्यसभेत खासदार आहे. तसेच मोदी सरकारमध्ये मंत्रीपद सांभाळत आहे. यात ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रदेशच्या गुना, मनसुख मांडिवाय गुजरातच्या पोरबंदर, भूपेंद्र यादव राजस्थानच्या अलवर, राजीव चंद्रशेखर केरळच्या तिरूअनंतपुरम, सर्बानंद सोनोवाल आसामच्या डिब्रुगढ, परसोत्तमई रूपला गुजरातच्या राजकोट आणि व्ही मुरलीधरन केरळच्या अट्टिंगल सीटमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवतील.


Comments
Add Comment