नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीमधून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गांधीनगर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून निवडणूक लढवतील. भाजपचे महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजंयत पांडा आणी मीडिया प्रभारी अनिल बलूनी यांनी पक्ष मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
या यादीत ३४ केंद्रीय मंत्र्यांशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या नावाचाही समावेश आहे. बिरला पुन्हा एकदा कोटा येथून लोकसभा निवडणूक लढवतील. यादीनुसार केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर केरळच्या तिरूअनंतपुरम येथे, सर्बानंद सोनोवा आसामच्या डिब्रुगढ येथून, केंद्रीय मंत्री किरण रिजीज अरूणाचल पूर्व येथून, भूपेंद्र यादव राजस्थानच्या अलवर येथून. ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रदेशच्या गुना येथून, संजीव बलियान मुझफ्फरनगर येथून आणि स्मृती इराणी अमेठीमधून निवडणूक लढवतील.
भाजपने ज्या अन्य केंद्रीय मंत्र्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे त्यातपरषोत्तम रुपाला (राजकोट), मनसुख मांडविया (पोरबंदर), देवुसिंह चौहान (खेड़ा), अर्जुन राम मेघवाल (बीकानेर), गजेंद्र सिंह शेखावत (जोधपुर) कैलाश चौधरी (बाड़मेर), जितेंद्र सिंह (उधमपुर), अन्नपूर्णा देवी (कोडरमा), अर्जुन मुंडा (खूंटी), वी मुरलीधरन (अट्टिंगल), वीरेंद्र खटीक (टीकमगढ़), फग्गन सिंह कुलस्ते (मंडला), जी किशन रेड्डी (सिकंदराबाद), सत्यपाल सिंह बघेल (आगरा), अजय मिश्रा ‘टेनी’ (खीरी), कौशल किशोर (मोहनलालगंज), भानु प्रताप वर्मा (जालौन), साध्वी निरंजन ज्योति (फतेहपुर), पंकज चौधरी (महाराजगंज), निसिथ प्रामाणिक (कूचबिहार), शांतनु ठाकुर (बनगांव) और सुभाष सरकार (बांकुड़ा) के नाम शामिल हैं.
या यादीत माजी दोन मंत्र्यांचाही समावेश आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान विदिशा येथून उमेदवार असतील तर भाजपमधील सध्याच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट कापून पक्षाने आलोक शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देव त्रिपुरा पश्चिम येथून लोकसभा निवडणूक लढवतील. पक्षाने नवी दिल्ली येथून केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज, दक्षिण दिल्लीतून रमेश बिधुडी यांच्या जागी रामवीर सिंह बिधुडी, चांदनी चौक येथून माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या जागी प्रवीण खंडेलवाल, पश्चिम दिल्लीतून कमलजीत सेहरावत यांना उमेदवारी दिली आहे.