Monday, May 19, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

५० एमपी कॅमेरा, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आणि किंमत फक्त ६,४९९ रूपये

५० एमपी कॅमेरा, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आणि किंमत फक्त ६,४९९ रूपये

मुंबई: जर तुम्हाला बजेट रेंजमध्ये नवा फोन खरेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. कारण Xiaomi चा सब ब्रांड POCOचा एक फोन अर्ध्या किंमतीत तुम्हाला मिळत आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅमसोबत १२८ जीबी स्टोरेज मिळत आहे.सोबतच ग्राहक हा फोन ७ हजाराहूनही कमी किंमतीत खरेदी करू शकतात.


इकॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर Poco C55 च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची विक्री सध्या १३,९९९ रूपयांच्या ऐवजी ६,४९९ रूपयांना केली जात आहे. म्हणजेच ग्राहकांना या फोनवर तब्बल ५४ टक्क्यांची मोठी सूट दिली जात आहे. इतकंच नव्हे तर ग्राहकांना अनेक बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. सोबतच ग्राहकांना जुन्या फोनच्या एक्सचेंजवर ६१५० रूपयांची सूट मिळू शकते. दरम्यान, अधिकाधिक डिस्काऊंट मिळवण्यासाठी फोन चांगल्या स्थितीत असणे गरजेचे आहे.



Poco C55 चे स्पेसिफिकेशन


ड्युअल सिम सपोर्ट
६ जीबी रॅम
MediaTek Helio G85 प्रोसेसर
120Hz टच सँपलिंग रेट
534 nits पीक ब्राइटनेस
60Hz रिफ्रेश रेट
6.71-इंच HD+ (720×1,650 पिक्सल) LCD डिस्प्ले
50MP रेयर कॅमेरा
5MP फ्रंट कॅमेरा
5,000mAh बॅटरी

Comments
Add Comment