Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीRahul Gandhi : राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी!

Rahul Gandhi : राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी!

सुरक्षेत करण्यात आली वाढ

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणेच (Rajiv Gandhi) बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त (Bharat Jodo Nyay Yatra) राहुल गांधी नाशिकमध्ये येणार आहेत. त्यासाठी नाशिक काँग्रेसकडून राहुल गांधींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात असतानाच राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याचा कॉल काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना (Nashik Police) आला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन नाशिक पोलीस आयुक्तालयात आठ दिवसांपूर्वी आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौकशी करत धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. तो माथेफिरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची माहिती नाशिक पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिली असून संबंधित व्यक्तीवर पोलिसांची नजर कायम आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी सांगितले की, आठ ते दहा दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात एक कॉल आला होता. राहुल गांधी यांच्या हत्येचा कट रचला गेला आहे. राजीव गांधींप्रमाणेच राहुल गांधींना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली होती. या धमकीची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक इतर शाखांनी याबाबत शहानिशा केली असता ज्या व्यक्तीने फोन केला होता. तो व्यक्ती नाशिक येथील गंगापूर हद्दीत राहत असून मानसिक आजाराने त्रस्त आहे.

तसेच गेल्या दहा वर्षांपासून त्या व्यक्तीला दारू पिण्याचे व्यसन आहे. व्यक्तीने फोन हा दारूच्या नशेत केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. संपूर्ण अहवाल केंद्रीय तपास यंत्रणांना पाठवण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात असून त्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती सुभाष पवार यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -