Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीAditi Tatkare : "लोककल्याणकारी योजना सक्षमपणे राबविण्यासाठी शासन आपल्या दारी"- मंत्री आदिती...

Aditi Tatkare : “लोककल्याणकारी योजना सक्षमपणे राबविण्यासाठी शासन आपल्या दारी”- मंत्री आदिती तटकरे

उदय कळस

म्हसळा : लोककल्याणकारी योजना प्रभाविपणे राबविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या शासन आपल्या दारी उपक्रमाचे उदघाटन राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल म्हसळ्याच्या भव्य पटांगणात करण्यात आला. याप्रसंगी विशेष कार्यकारी अधिकारी अमित शेडगे, उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) महेश पाटिल, तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, गटविकासअधिकारी कुलदीप बोगे, गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड, निवासी नायब तहसीलदार धर्मराज पाटील, माजी सभापती महादेव पाटील, माजी कृषी सभापती बबन मनवे, अंकुश खडस छाया म्हात्रे, जयश्री कापरे, नगरसेविका राखी करंबे, मीना टिंगरे, सोनल घोले, प्राचार्य प्रकाश हाके आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुख्य उपस्थितीत लोणेरे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील हजारो लाभार्थींनी या योजनेचा लाभ उठवला.

आजही खूप मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपस्थित राहून योजनांचा घेत असल्याचे समाधान निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्तीला होत आहे. एकाच छताखाली कृषी, महसूल, महिला बालविकास, आरोग्य, जातींचे दाखले, आदिवासी समाजाला लागणारे दाखले, दिव्यांग दाखले उपलब्ध करून दिले आणि यासाठी मेहनत घेणाऱ्या तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मंत्री आदिती तटकरे यांनी धन्यवाद दिले. त्यांनी पुढे सांगितले की, जवळपास २०० योजनांचा लाभ या उपक्रमातून लाभार्थ्यांना मिळणार असून यामध्ये सकारात्मक बदल भविष्यात घडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य घटकापर्यंत पोचेल यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोचविण्याचे आवाहन आदिती तटकरे यांनी केले. भविष्यात आरोग्य कॅम्प आणि अश्याप्रकाराची शिबीरे आयोजित करून शासन आपल्या दारी उपक्रमाची योग्य प्रकारे करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी महेश पाटिल यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -