Thursday, October 23, 2025
Happy Diwali

Chandrakant Patil : ...तर त्या विद्यापीठांची मान्यता काढून घेणार!

Chandrakant Patil : ...तर त्या विद्यापीठांची मान्यता काढून घेणार!

चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आनंदशाळा समारंभाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते झाले उद्घाटन करण्यात आले. केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण संस्थाचालकांना एक इशारा दिला. नवीन शैक्षणिक धोरणाची (New Education Policy) जूनपासून जे अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेणार, असं ते म्हणाले. तुम्ही सुधरा, दम देत नाही पण प्रेमाचा सल्ला समजा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सुधरा नाहीतर कॉलेजेस बंद करा

चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यात फ्लेम युनिव्हर्सिटीत १३ लाख वार्षिक फी आहे, ऍडमिशन मिळत नाही तिथे माझ्यासारख्याची चिट्ठी द्यावी लागते, ऐकत नाहीत. मालक शहा माझे मित्र आहेत. त्यांनी १०० एकरात ८०० कोटी रुपये खर्च केले आहे. मुलींना मोफत शिक्षणाबाबत कॅबिनेट निर्णय झाला आहे. आता जी आर निघेल. तुम्ही सुधरा, सुधारा नाही म्हणत सुधरा म्हणतोय जरा ग्रामीण भागातला शब्द आहे. सुधरा नाहीतर कॉलेजेस बंद करा, असं त्यांनी म्हटलं.

त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेईल

पुढे ते म्हणाले, जूनमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाला पर्याय नाही. ज्यांना या धोरणाची जूनपासून अंमलबजावणी करायची नसेल त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ज्या विद्यापीठाला ममता बॅनर्जींसारखे बंड वाटत असेल, आम्ही करणार नाही, अशी त्यांची भूमिका असेल तर त्या विद्यापीठाची मान्यता रद्द होईल. आम्ही दम देत नाही, प्रेमाचा ग्रामीण तरुण म्हणून सल्ला देतोय, असे त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >