
सुदैवाने जीवितहानी नाही
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. आज सकाळी ठाणे बेलापूर रोडवर देखील आगीची घटना घटली. सकाळी सव्वाआठच्या सुमारास या मार्गावर असलेल्या रबाळे स्टेशन समोर भाजीच्या टेम्पोला आग लागली. ऐरोली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास ठाणे बेलापूर रस्त्यावरून वाशी कडून ठाण्याकडे जात असताना टेम्पोला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, टेम्पो व आतील सामानाचे नुकसान झाले.