नवी दिल्ली: मार्च महिन्याची सुरूवात झाली आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ मार्चला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. म्हणजेच १ मार्च २०२४ ला सिलेंडर महाग झाला आहे. दरम्यान, ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी किंमतीतील ही वाढ कर्मशियल गॅस सिलेंडरच्या दरात केली आहे. दिल्लीमध्ये २५ रूपये तर मुंबईमध्ये सिलेंडरच्या किंमतीत २६ रूपयांनी वाढ झाली आहे.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ करत महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. गेल्या महिन्यात बजेटच्या दिवशी १ फेब्रुवारी २०२४ला १४ रूपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता २५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. IOCL च्या वेबसाईटवर बदललेले दर जाहीर करण्यात आले आहेत. १ मार्च २०२४ म्हणजेच आजपासून हे नवे दर लागू आहेत.
नव्या दरानुसार राजधानी दिल्लीत कर्मशियल सिलेंडर १७९५रूपयांना मिळेल. तर कोलकातामध्ये हा सिलेंडर १९११ रूपयांना मिळेल. मुंबईमध्ये कमर्शियल सिलेंडरची किंमत वाढून १७४९ रूपये तर चेन्नईमध्ये १९६०.५० रूपये झाली आहे.
फेब्रुवारीमध्ये होती इतकी किंमत
याआधी या बदलाआधी दिल्लीमध्ये १९किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत १७५५.५० रूपयांनी वाढून १७६९.५० रूपये झाली होती. इतर महानगरांमध्ये बोलायचे झाल्यास कोलकातामध्ये एका सिलेंडरची १८६९ वरून १८८७ रूपये झाली होती. मुंबईमध्ये आधी जो कमर्शियल सिलेंडर १७०८ रूपयांना मिळत होता तो १७२३ रूपये झाला होता. तर चेन्नईमध्ये याची किंमत १९२४.५० रूपयांवरून १९३७ रूपये झाली होती.