Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीGreen Tea: एका दिवसात किती ग्रीन टी प्यावी, घ्या जाणून

Green Tea: एका दिवसात किती ग्रीन टी प्यावी, घ्या जाणून

मुंबई: आजकाल ग्री टी आपल्या किचनमधील महत्त्वाचा घटक बनली आहे. खासकरून ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी. यामुळे केवळ फ्रेशच वाटत नाही तर आपले शरीर आतून साफ होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये पोषक गुण आपल्या शरीराला स्वस्थ राखण्यासोबतच वजन घटवण्यातही मदत करतात.

आरोग्य तज्ञांच्या मते संपूर्ण दिवसभरात २ ते ३ कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. इतक्या प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने त्याचे फायदे मिळतात आणि नुकसान होत नाही. ग्रीन टीमध्ये अनेक प्रकारचे चांगले तत्व असतात जे आपल्या शरीराला स्वस्थ राखतात.

यामुळे हृदय मजबूत बनते. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच यामुळे फ्रेशही वाटते. यामुळे दररोज प्रमाणात ग्रीन टी प्यावी. ज्यामुळे आरोग्य चांगले राहील. अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केल्यास याचे नुकसानही होऊ शकते. सगळ्यात आधी ग्रीन टीमध्ये कॅफेन असते. आपण जर अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केले तर शरीरात कॅफेनचे प्रमाण वाढते. यामुळे झोप न येणे, चिडचिडेपणा, डोकेदुखी, तसेच हृदयाचे ठोके वाढतात.

दुसरा म्हणजे ग्रीन टीमध्ये टॅनिन असते जे आयर्नचे शोषण कमी करते. याचा अर्थ जर आपण जेवणानंतर लगेचच ग्रीन टी प्यायलो कर शरीरात जेवणातून मिळणारे आर्यन योग्य प्रमाणात मिळत नाही. यामुळे रक्ताची कमतरता होऊ शकते.

ग्रीन टी अधिक प्यायल्याने पोटदुखी तसेच अपचनाची समस्या जाणवू शकते. कारण ग्रीन टी अॅसिडिटी वाढवू शकते. यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -